EMI, व्याजदर आणि Personal Loan – घेण्यापूर्वी या चुका टाळा!

 Personal Loan घेताना होणाऱ्या चुका — आणि त्यातून वाचायचे कसे? 

(Personal Loan घ्यायच्या चुका)

    




Personal Loan घेताना होणाऱ्या चुका आणि त्यातून वाचायचे उपाय - Credit Wings Blog



आजकाल Personal Loan घेणे खूपच सोपे झाले आहे. कोणतीही बँक, NBFC किंवा वित्तीय संस्था,ऑनलाइन ॲप्स, वेबसाईट वरून अगदी जलद गतीने पर्सनल लोन देतात भरपूरसे लोक आजकाल मोबाईलवर काही क्लिक, बँकेकडून कॉल, किंवा ऑनलाइन ॲप्लिकेशन वरून सगळीकडे "जलद लोन" मिळण्याची जाहिरात दिसते. तसेच एजंट लोक कमी व्याजदर अमिष दाखवून आपल्याकडून आपले सर्व Personal Loan साठी आवश्यक डॉक्युमेंट्स घेऊन वेगवेगळ्या बँक, एनडीएफसी किंवा वित्तीय संस्थांना कागदपत्र देऊन आपले फाईल कोणतीही चौकशी न करता लॉगिन करून घेतात किंवा एकाच वेळी अनेक वित्तीय संस्थांमध्ये मल्टिपल फंडिंग मध्ये कागदपत्रे देऊन आपली फाईल लॉगिन करतात.पण या सोप्या पद्धती किंवा शॉर्टकट वापरण्यामध्ये अनेक लोक नकळत अशा चुका करतात ज्याकी पुढे मोठा आर्थिक भार बनतात किंवा मोठ्या संकटात सापडतात. चला तर बघूया Personal Loan कसे घ्यावे, त्या कोण कोणत्या चुका आहेत आणि त्यापासून कसे वाचता येईल आणि Personal Loan घेण्याच्या टिप्स.ऑनलाइन Personal Loan सुरक्षिततेचे नियम,Personal Loan ची चांगली योजना,Personal Loan घेताना काळजी.



 EMI भरता येईल का?  याचा विचार न करणे 


लोन घ्यायच्या पाहिले आपले उत्पन्न (Income) खर्चाचा हिशोब तपासणे गरजेचे असते.

अनेक वेळा "EMI फक्त ₹3,000" अशी ऑफर आकर्षक वाटते, पण ते 5 वर्षे सतत द्यावे लागतील हे लक्षात घेतले जात नाही. तोच EMI 4 ते 5 वर्ष भरता भरता नाकी नऊ येतात. हा EMI आपल्याला भरता येईल का या साठी सुध्धा एक साधं आणि सोप्पा असा गणित असता. म्हणजे तो EMI आपल्याला भरण्यास पुढे भविष्यात जड जात नाही. आपल्या उत्पन्नाच्या (income) 20% किंवा 30% पेक्षा जास्त नसला पाहिजे. 

उदाहरण - जर तुमचे उत्पन्न मासिक (monthly income) जर ₹ 25,000 असल्यास त्या रकमेच्या 20% ते 30% रक्कम एमी म्हणून आपण भरू शकतात. म्हणजेच ₹5,000 ते ₹7,500 पर्यंत EMI म्हणून (Comfortable) योग्य आहात.

💡 टिप: EMI तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 20% ते 30% पेक्षा जास्त नको.


 व्याजदराची योग्य तुलना न करणे 

 (Personal Loan व्याजदर तुलना)


 बँकेकडून, SMS वरून, Email वरून किंवा फक्त मोबाईल ॲप्लिकेशन वरून आलेली ऑफर आपण लगेच स्वीकारणे ही मोठी चुकी होऊ शकते. वित्तीय संस्था कडून दिलेली ऑफर मध्ये व्याजदर, प्रोसेसिंग फीस, इन्शुरन्स प्रीमियम, डॉक्युमेंट चार्जेस इत्यादी सर्व गोष्टींची वेगवेगळ्या बँकेसोबत तुलना करून बघा.

त्याऐवजी किमान ३-४ बँका, NBFC किंवा डिजिटल लोन अश्या सर्व कंपन्यांचे व्याजदर आणि प्रोसेसिंग फीस ची तुलना नक्कीच नेहमी करा.

थोडा वेळ व्यवस्थित लक्ष देऊन केलेली ही तुलना तुम्हाला तुमचे हजारो रुपये वाचवून देऊ शकते. 


लपवलेल्या शुल्कांकडे (Hidden charges)दुर्लक्ष करणे 

(Personal Loan लपलेले शुल्क)


आज काल सर्व बैंक, NBFC, वित्तीय संस्था वेगवेगळे लोन देण्या साठी चार्जेस किंवा शुल्क लावत असतात. जसे की Processing Fee, Foreclosure Charges, Insurance Premium, Documents charges, shares, part payment charges, bouncing charges, Cibil charges,etc. हे सर्व लहान लहान अक्षरात (terms & conditions) दिलेल्या agreement वर लिहिलेले असते. हा एग्रीमेंट सही करण्याच्या पहिले एकदा नीट वाचून बघावा किंवा आपल्याला न समजल्यास आलेल्या वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधी कडून तो नीट वाचून घ्यावा किंवा मी नीट समजून घ्यावा व त्यानंतरच त्यावर विचार करून योग्य तो विचार करून निर्णय घ्यावा अशाच एग्रीमेंट वर टर्म्स अँड कंडिशन बारीक अक्षरात लिहून बँक किंवा फायनान्स एटीसी इत्यादी आपल्याकडून सही करून घेतात. जर तुम्ही नीट वाचले नाही तर लोन घेतल्यानंतर अनपेक्षित खर्चांचा धक्का बसू शकतो.

💡 टिप: आपण कोणत्याही कागदपत्रावर सही करताना सर्व कागदपत्र नीट वाचून आणि समजून घेऊन मगच सही करावी.


CIBIL स्कोर वारंवार तपासणे टाळणे

CIBIL स्कोर कसा तपासावा

सध्याच्या परिस्थितीमध्ये आजकाल भरपूर अशा बँक, NBFC, ऑनला इन एप्लीकेशन ऑनलाइन वेबसाईट भरपूर च्या कंपन्या फ्री सिबिल स्कोर च्या नावाखाली आपला डेटा त्यांच्याकडे सेव करून ठेवतात तसेच आपल्याला फ्री सिबिल स्कोर दाखवतात. आपण वारंवार हप्त्याला महिन्याला किंवा वर्षाला चेक करतो त्यामुळे आपल्या सिबिल स्कोर मध्ये याची इन्क्वायरी सेक्शन मध्ये एन्ट्री दिसते त्यामुळे आपल्या आपला सिबिल स्कोर कमी होण्याची शक्यता असते. 

आजकाल भरपूरशा बँक आणि एनडीएफसी कंपन्या सिबिल स्कोर च्या स्लॅब नुसार आपला व्याजदर ठरवत असतात. तुमचा CIBIL स्कोर कमी असल्यास बँक किंवा NBFC कंपन्या जास्तीतजास्त व्याजदर लावू शकतात किंवा लोन नाकारू शकतात.

लोन अर्ज करण्याआधी CIBIL तपासून स्कोर 750+ ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी आपण वारंवार आपला CIBIL स्कोर तपासणी टाळले पाहिजे. वारंवार तपासलेला CIBIL स्कोर मुळे आपला सिबिल स्कोर कमी होण्याची दाट शक्यता आहे. 


आपल्या गरजेपेक्षा जास्त लोन घेणे

जास्त Personal Loan घेण्याचे नुकसान


"अजून थोडं जास्त घेऊ, पुढे पैसा लागेल" हा विचार चुकीचा ठरू शकतो.

Personal Loan EMI कसे मॅनेज करावे

जास्त लोन घेणे म्हणजे जास्त EMI आणि जास्त व्याज हे शेवटी तुमच्या आर्थिक नियोजनावर ताण आणू शकत. त्यामुळे आपल्या गरजेपेक्षा जास्त लोन घेणे हे आपल्याला अपायकारक ठरवू शकते. म्हणून लोन घेताना सर्वात पहिले आपण आपल्या लागत असलेले लोणचे गरज ओळखणे हे खूप महत्त्वाचे असते. भरपूर से लोक आजकाल आपल्या गरजेपेक्षा जास्त वस्तू किंवा गोष्टी या विचार विनिमय न करता सरळ कर्जावर घेऊन टाकतात. आणि मग नंतर दोन दोन तीन तीन लोन चे EMI भरण्यास जड जातो. मग आपले घरचे खर्च बाहेरच्या खर्च किंवा चालू असल्यास हॉस्पिटलचे खर्च आणि त्यात अजून कर्जाची EMI हे सर्व भरण्यास जड जातो आणि यामुळे जास्त मानसिक कष्ट व त्रास होतो. त्यामुळे हे सर्व प्रकार करण्याच्या पहिले आपण आपले फायनान्शिअल प्लॅनिंग पहिलेच करून घेतल्यास आपला त्रास आणि आपले पैसे नक्कीच वाढण्यास आणि वाचण्यास खूप मदत होते.


फसवणूक करणाऱ्या एप्लिकेशन्स वरून लोन घेणे


आजकालPlay Store किंवा सोशल मीडियावरच्या अनेक ॲप्स, फसवणूक करणारे Personal Loan Apps खोट्या किंवा फसवणूक करणारे असतात. ते तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल केल्यानंतर ते तुमचा डेटा चोरणे, जास्त व्याज लावणे, त्रास देणे, ब्लॅकमेल करणे, धमक्या देणे अशा पद्धतीने फसवतात.

💡 टिप: फक्त RBI-मान्यताप्राप्त बँका किंवा NBFC कडून योग्य चौकशी करून लोन घ्या.


निष्कर्ष (conclusion)


कोणत्याही प्रकारचे Personal Loan घेणे वाईट नाही, पण त्यात  चौकशी न करता घाई करणे हीच सर्वात मोठी चूक आहे.

थोडं थांबा, पहिले सर्व माहिती गोळा करा, या सर्व माहिती ची तुलना करा आणि EMI परवडेल याची खात्री करा.

लक्षात ठेवा —एकदा जर लोन घेताना विचार नाही केला तर आपण यामध्ये अडकून जाऊन पुढे वर्षानुवर्षे त्याची किंमत मोजावी लागेल आणि असा सर्व त्रास सहन करावा लागेल.


RBI मान्यताप्राप्त Personal Loan सर्व बँक एनबीएफसी वित्तीय संस्था या आरबीआयच्या गाईडलाईन्स खाली चालत असते तर आपल्याला जर लोन घ्यायची असेल तर आपणही जी संस्था किंवा कंपनी आरबीआयची रुल्स फॉलो करते त्यांच्या मार्फतच आपले लोन घ्यावे. म्हणजे भविष्यात काही फसवणूक झाली तर आपल्याला आरबीआय कडे तक्रारी करता येते आणि त्यावर योग्य तो न्याय सुद्धा आरबीआय मार्फत आपल्याला मिळतो.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा